दि.
आदरणीय मुख्याध्यापक /मुख्याध्यापिका
-----------------
खारघर
*विषय: शिवजयंती निमित्ताने आयोजित आंतरशालेय निबंध स्पर्धा*
सप्रेम नमस्कार,
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव संपूर्ण भारतभरात १९ फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. *भारत रक्षा मंच* या राष्ट्रीय संघटनेने शिवजयंतीच्या निमित्ताने खारघर व जवळपासच्या शाळांमध्ये आंतरशालेय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
*विषय* :
मराठी- वीर योद्धा छत्रपति शिवाजी महाराज
हिंदी - वीर योद्धा छत्रपति शिवाजी महाराज
English : Chhatrapati Shivaji Maharaj : The great warrior
*(निबंध लेखनासाठी विद्यार्थ्यांना वरिलपैकी कुठल्याही एका भाषेची निवड करता येईल.)*
*वयोगट*
अ : इयत्ता ५ ते ७ वी
ब: इयत्ता ८ ते १० वी
*शब्दमर्यादा* :
वयोगट अ : ३०० शब्द
वयोगट ब :५०० शब्द
*वेळ* : ४५ मिनिटे
*बक्षीस*
प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मानांकित विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.
स्पर्धेत सहभागी होणार्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्र देण्यात येणार असून *स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्या प्रत्येक शाळेला सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.*
निबंध स्पर्धा ज्या-त्या शाळेच्या इमारतीत च घेण्यात येईल जेणेकरुन विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये व त्यांचा वेळ ही वाचवा. आपण दिलेल्या सोयिस्कर वेळेनुसार आमचे प्रतिनिधी स्पर्धेच्या वेळी निरीक्षक म्हणून शाळेत उपस्थित राहतील.
तरीही आपल्या शाळेला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आम्ही सादर आमंत्रित करीत आहोत. आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
*धन्यवाद.*
आपली
*बीना गोगरी*
*प्रदेश अध्यक्षा, भारत रक्षा मंच*