*वास्तवातील कटू सत्य...* 😊😊
.
.
.
*मराठी माणसाना कामधंदा करण्याच प्रबोधन करा !*
दुसऱ्या राज्यांतून परप्रांतीय येणार नाहीत ! 😷
*मराठी माणसाला सचोटीने कामधंदा करायला सांगा !*
परप्रांतींयांची गरज नाही लागणार !
*मराठी माणसाला स्वत: मधला ऊर्मटपणा कमी करायला सांगा !*
परप्रांतीयांची गरज नाही पडणार !
*मराठी माणसाला मेहनत करायला सांगा !*
शांत झोपेसाठी दारू शोधावी नाही लागणार !
गोपालन कोण करणार तर भैय्या !
( *गवळी समाज* कुठे गेला )
कपडे कोण ईस्त्री करणार तर भैय्या !
( परीट समाज कुठे गेला )
मासे कोण विकणार तर भैय्या
( *कोळी समाज* कुठे गेला )
मटण व कोंबडी कोण विकणार तर यू.पी. / बिहार व बांगलादेशी मुसलमान
( *खाटीक समाज* कुठ गेला )
मातीची गाडगी मडकी कोण विकणार तर भैय्या
( *कुंभार समाज* कुठ गेला )
बांबूच्या टोपल्या व तत्सम वस्तू बनवून कोण विकणार तर कर्नाटकातले लोक
( *बुरूड समाज* कुठ गेला )
लोखंड काम कोण करणार तर भैय्या
( *लोहार समाज* कुठ गेला )
केश कर्तनालय कोण चालवतयं ( यू.पी. व बिहारी )
*न्हावी समाज* कुठे गेला !
दगडांची काम करायला कर्नाटकी मजूर
( *वडार समाज* कुठ गेला ! )
रंगरंगोटी करायची आहे तर बोलवा *भैय्या* मंडळींना !
( आमचा *रंगारी समाज* गाढ झोपलाय ! )
घरात लाकडाच काम करायच आहे तर बोलवा विश्वकर्मा भैय्या सुतारांना !
( आमचा *सुतार समाज* पोट भर जेवून पहुडला आहे ! )
भैय्या सुतार स्वत: ला कधीही सुतार म्हणत नाहीत ! ते कायम वरच्या दर्जाची काम करतात म्हणून स्वत:ला *विश्वकर्मा* म्हणवून घेतात !
कोकणात आंब्याची राखण करायला नेपाळी !
( कोकणातली मुले राखणदारी नाही करू शकत ! )
टायर च पंक्चर काढायला केरळी !
( मराठी माणसाल मेहनत नाही झेपत ! )
नारळ विकायला दक्षिण भारतीय..
प्रत्येक गावात *अंय्यगार* बेकरी आहे ! ( कधी मालवणात गेलात तर मराठी माणसाच्या *विजया बेकरी* ला अवश्य भेट द्या ! अय्यंगार बेकरी विस्मरणात जाईल तुमच्या )
प्रत्येक कामाची लाज वाटणारा मराठी समाज प्रगती करूच शकत नाही !
लक्षात घ्या हे वरती लिहीलेले सर्व व्यवसाय रोखीचे आहेत ! त्याच बरोबर असे कित्येक व्यवसाय आहेत जे रोख व्यवहारावर चालतात !
परप्रांतीय हे सर्व व्यवहार करतात करोडो रूपयांची रोज कमाई होते ती फक्त परप्रांतींयांची !
*कारण ते मेहनत घेतात !*
साधे उदाहरण घ्या ! संपूर्ण महाराष्ट्रात रोज किती कपड्यांना इस्त्री करून घेतल जात असेल ! एका कपड्याचे इस्त्रीचे कमीत कमी शुल्क ५ रूपये तरी असेलच !
*आता हिशोब करून बघा ! किती पैसा महाराष्ट्राबाहेर जातो आहे !*
मी सध्या ज्या गावात आहे तीथे १०० घरे आहेत ! संपूर्ण गावात एकच इस्त्रीवाला *भैय्या* आहे ! प्रत्येक घरात कमीत कमी ४ माणस आहेत ! प्रत्येक कुटुंबांमधून रोज कमीत कमी ४ कपडे इस्त्री ला जातात ! १००×४=४०० कपडे म्हणजे ५ रूपयां प्रमाणे झाले २००० रूपये रोजचे ! ३० दिवसांचे झाले ६० हजार ! गावातल्याच माणसाने त्या इस्त्रीवाल्या *भैय्या* ला जागा भाडे तत्वावर दिली ! महिना दोन हजार रूपये ! *भैय्या* सकाळी सहा वाजता दुकान सूरू करतो ! कारण गावातील पुरूष मंडळींना एम. आय. डी. सी. त महिना ८ ते १० हजार रूपये कमवायला कडक इस्त्री चे कपडे घालून जायच असते ! 😂😂
कॉलेजातील्या मुलां मुलींना कडक इस्त्रीचे कपडे घालून शिकायला जायच असते !
पण गावातल्या कोणालाही स्वत: इस्त्रीवाला व्हावे असे वाटत नसते !
इस्त्रीवाल्या *भैय्या* च्या गरजा कमी ! आपण बरे, आपल काम बरे ! त्यांनी स्वत: ला कामात ईतक गुंतूवून घेतलय की तो कुठच्याही भानगडीत पडत नाही ! दुकान हेच त्याचे घर ! चार भांडी व बाजल हाच त्याचा संसार !
वर्षभराने भैय्या कमावलेला पैसा घेऊन गावी जातो ! पण दुकान संभाळायला स्वत:च्या गावातला दुसरा सगासोयरा आल्यावर त्याला सर्व समजावून च जातो !
आणि *भैय्या* चा सगासोयरा ईमाने ईतबारे मुळचा मालक *भैय्या* परते पर्यंत दुकान सांभाळतो !
बदलत्या काळात कुठलाही नैतीक व्यवहार करण गौण नाही ! काही मराठी माणसांनी ते करून पण दाखवल आहे ! वानगी दाखल ! *चितळे* सध्या गोपालन व दुग्ध व्यवसायात अग्रेसर आहेत ! म्हणजे म्हटले तर गवळी समाजाचे प्रतिनिधीत्व करत आहेत !
अशी भरपूर उदाहरणे सापडतीत !
ह्या साठी प्रबोधन खूप गरजेच आहे ! कुठल्या पक्षाचा झेंडा हातात घेऊन घोषणा देत फिरून कोणी मोठे होत नाही ! मोठा होतो तो फक्त पक्ष आणि पक्षाचा नेता !
उगीच कशाला ओरडायचे परप्रातींयांच्या नावाने ! आपण नाकर्ते पणाने त्यांना संधी दिली !
त्यांनी संधीचे सोने केले !
*भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी !* ह्या तत्वावर ह्या परप्रांतींयांनी ईथे मस्त बस्तान बसवल आहे ! ते ईथे पैसा कमवायला आले आहेत. ईथल्या मातीशी व समाजाशी त्यांना काहीही देणघेण नाही ! ते ओरबाडचा प्रयत्न करणारच !
आजचेच बघा कोकणातला आंबा विकायला बळीराजाचा शेतीमाल विकायला ( कोरोनाबंधन अर्थात करोनाबंद ) दारू विक्री वरील बंधने शिथील !
दारूविक्रिचे ९५% पेक्षा जास्त परवाना धारक परप्रातींय अमराठी आहेत. मराठी शेतकरी बागायतदार बर्बाद झाले तरी चालतील ! कर्जाच्या ओझ्या खाली येऊन जमिनी विकतील ! परप्रांतीय त्या जमिनी विकत घेतील ! मराठी माणूस एम. आ. डी. सी. त नोकरी ला जाईल ! १० हजार रूपये महिना कमवायला !
🙏🙏.....*