जे एम म्हात्रे चारीटेबल ट्रस्ट तर्फे मसाले दुधाचे वाटप

जे एम म्हात्रे चारीटेबल ट्रस्ट तर्फे मसाले दुधाचे वाटप 



पनवेल : 31 डिसेंबरच्या रात्री प्रत्येक जण आपल्या कुटुंबासमवेत, आपल्या मित्रमंडळीं समवेत सेलिब्रेशन करत असतो.

अशा वेळी आपल्या सेलिब्रेशनला कुठेही गालबोट लागू नये यासाठी आपल्या कुटुंबापासून दुर आपले कर्तव्य बजावणारे आपले महाराष्ट्र पोलीसबांधव  यांच्यासाठी माझ्या जे. एम. चॅरिटेबल संस्थेचे सदस्य आणि शेतकरी कामगार पक्ष खांदा कॉलनी चे अध्यक्ष श्री.अनिल बंडगर, योगेश कोठेकर, सचिन मोकल, पंकज वाघ यांनी रात्री गस्तीवर असणाऱ्या आपल्या बांधवांसाठी या थंडीच्या दिवसात मसाले दूध देऊन थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन केले.

मला अभिमान आहे माझ्या 
 "महाराष्ट्र पोलिसांचा आणि माझ्या सहकाऱ्यांचा..." असे प्रितम म्हात्रे म्हणाले.