सेतूबाधित प्रकल्पग्रस्त संघटना आणि एमएमआरडीए यांच्यात सकारात्मक बैठक

सेतूबाधित प्रकल्पग्रस्त संघटना आणि एमएमआरडीए यांच्यात सकारात्मक बैठक




पनवेल (प्रतिनिधी) न्हावा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पग्रस्त संघटना आणि एमएमआरडीएचे अधिकारी यांच्यात उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मंगळवारी (दि. 4) बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी सकारात्मक चर्चा झाली.
          या बैठकीला न्हावा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, कोळी समाजाचे पनवेल तालुका अध्यक्ष उत्तम कोळी, भाजप उलवे नोड 1चे अध्यक्ष मदन पाटील, तरघरचे सरपंच मच्छिंद्र कोळी, उपसरपंच देवेंद्र पाटील, शैलेश भगत, तर एमएमआरडीएकडून मॅनेजर एम. पी. सिंग, विद्या केणी उपस्थित होते.
या वेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सेतू प्रकल्पात बाधित होत असलेल्या उर्वरित मच्छीमारांनाही नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली. ते म्हणाले की, सेतूमुळे बाधित होणार्‍या गव्हाण, न्हावा, जासई, वहाळ, उलवे, तरघर, मोहा, मोरावे परिसरातील सर्व मच्छीमारांना न्याय मिळाला पाहिजे. ज्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही त्यांना ती मिळावी यासाठी एमएमआरडीएकडून लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी. यावर एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पात्र मच्छीमारांची कागदपत्रे तपासून ती पुढे पाठवू, तसेच या प्रक्रियेसाठी मंगळवारी व गुरुवारी येथे येऊन पडताळणी करू, असे आश्वासन दिले.

Popular posts
विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांतून ११केव्ही विद्युत वाहिनी सुरू होत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी
Image
पोलीस व आदिवासीमध्ये पेटली संघर्षाची ठिणगी ; शेवठी, बेकायदेशीर दगडखाणी मालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश..
Image
नवी मुंबईत जागतिक महिला दिनानिमित्त विविध कलागुणांचा उत्साही अविष्कार व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
Image
पनवेलकरांच्या भीषण पाणीटंचाईवर आमदार विक्रांत दादा पाटील यांनी वेधले सरकारचे लक्ष.....!!
Image
२०३० पर्यंत ५०० दशलक्ष लोकांमध्ये श्रवणशक्ती कमी होण्याची शक्यता - जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
Image