कोपरागावातून निघालेल्या एकविरा आईच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची ओढ !-विरोधी पक्षनेत्यां सहित स्थायी समिती सभापतींनी घेतले दर्शन

कोपरागावातून निघालेल्या एकविरा आईच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची ओढ !-विरोधी पक्षनेत्यां सहित स्थायी समिती सभापतींनी घेतले दर्शन


खारघर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या निर्बंधामुळे भाविकांच्या उत्साहावर वीर्जन पडत होते. महाराष्ट्रात नव्हे तर परदेशातून आई एकविरेचे असंख्य भक्तजन आहे .करोनाच्या निर्बंधामुळे काही प्रमाणात कमी होत असल्याने एकविरा आई च्या भक्तांना आईला भेटण्याची ओढ लागली आहे.पनवेल तालुक्यातील कोपरागाव वेसुदेवी युवा मित्र मंडळ व हनुमान ग्राम विकास मंडळ कोपरागाव (खारघर) ते श्री क्षेत्र (कार्ला) एकविरा आई देवी पालखी पदयात्रा सोहळ्याला आज पासून सुरुवात झाली आहे. पालखीचे दर्शन घेण्यासाठी पनवेल उरण सह अन्य भागातून भक्त जण उपस्थित होते.यंदा पालखी चे नऊ वे वर्ष असून पालखी थाटामाटात गावातून नेण्यात आली.  पनवेल तालुक्यातून मानाची पालखी म्हणून कोपरा गावची एकविरा आईची ही पालखी ओळखली जाते.कोरोना संकट दूर होण्यासाठी भक्तां सहित वेसूदेवी युवा मित्र मंडळ अध्यक्ष रोहित रतन कोळी यांनी आई एकविरा चरणी साकडे घातले आहेत .

      पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री प्रीतम म्हात्रे यांनी पालखीचे आवर्जून दर्शन घेऊन पालखीला खांदा दिला, सोबत पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती कोपरा गावचे रहिवासी नगरसेवक ॲड.नरेश ठाकूर व संतोष तांबोळी हे ही प्रितम म्हात्रे यांच्या सोबत पालखीला खांदा देण्यास उपस्थित होते.