द ग्रेट इंडियन ट्रॅव्हलने केला १९ हजार पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास; आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले कौतुक
पनवेल(प्रतिनिधी) द ग्रेट इंडियन ट्रॅव्हलने ०१ डिसेंबर २०२१ पासून ११ मार्च २०२२ पर्यंत देशातील सर्व राज्यांचा समावेश करून १९ हजार पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास केला असून नुकताच या प्रवासाचा समारोप खारघर येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी या मोहिमेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, अनिता पाटील, नेत्रा पाटील, माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर, जिल्हा चिटणीस गीता चौधरी आदी उपस्थित होते.
द ग्रेट इंडियन ट्रॅव्हल ही १०१ दिवसांची रोड ट्रिप मोहीम होती. जी कोविडमुळे प्रभावित झालेल्या लहान आणि सूक्ष्म व्यवसायांना मदत करण्यासाठी, सर्व भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये, भारत आणि तिची संस्कृती, परंपरा, रीतिरिवाज, पाककृती अशा विविध बाबतीत प्रेरक ठरली. या मोहिमेदरम्यान रोटरी क्लब, रोटरॅक्ट क्लब, एनजीओ क्षेत्र आणि स्टार्ट अप्स आणि लहान व्यावसायिक समुदायांसारख्या विविध आंतरराष्ट्रीय संस्थांमधील ८०० पेक्षा जास्त समविचारी लोकांच्या भेटी झाल्या व त्यामध्ये एकमेकांचे विचार मांडण्यात आले.
सपोर्ट युअर बिझनेस या आशयाच्या माध्यमातून सर्व पार्श्वभूमीतील लोकांना सक्षम करणे आणि त्यांच्यासाठी त्यांच्या व्यवसायाचा प्रचार आणि वाढ करण्यासाठी नेटवर्क स्थापन करण्याचे ध्येय आहे जे एक नेटवर्क प्लॅटफॉर्म आहे ज्याचे नेतृत्व तिचे संस्थापक संचालक रिंकी वनमोरे, सुश्री मदीहा शेख आणि कौस्तव घोष करतात. मोहिमेचे कारण लहान व्यवसायांना पाठिंबा देणे आणि त्यांचे ब्रँड आणि प्रयत्न ओळखणे हे असून द ग्रेट इंडियन ट्रॅव्हल या मोहिमेमध्ये एक संघ असून त्यामध्ये कौस्तव घोष हे संस्थापक, लक्ष्मी सोरते सह-संस्थापक, आर्या नायर जनसंपर्क आणि विपणन, भाविक देशमुख नेव्हिगेटर, अनित कौर बंगा विचारवंत, संशोधन आणि विकास, रितांशू शर्मा मीटिंग समन्वयक, सावराब समता वेबसाइट विकसक, तरुण मिश्रा ग्राफिक डिझायनर/ व्हिडिओ मेकर, अभिषेक वाळेकर वाहन ब्रँडिंग, शीतल सिरसीकर वाहन ब्रँडिंग म्हणून काम पाहतात.