जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी प्रारूप प्रभाग रचना, अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध
*अलिबाग,दि.28 (जिमाका):-* महाराष्ट्र राज्याच्या राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी निवडणूक विभाग व निर्वाचक गण याबाबत प्रारूप प्रभाग रचना प्रस्ताव, अंतिम प्रभाग रचना प्रस्ताव तयार करून प्रसिद्धी देण्याबाबत निर्देश दिले होते.
त्यानुसार रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रारूप अधिसूचना दि.02 जून 2022 रोजी प्रसिद्ध केली असून त्यावर प्राप्त हरकतीच्या अनुषंगाने कोकण विभागीय आयुक्तांनी दि.15 जून 2022 रोजी सुनावणी घेवून दि.22 जून 2022 रोजी प्रभाग रचना अंतिम केली आहे.
ही अधिसूचना रायगड जिल्हा परिषद, तालुक्यातील सर्व पंचायत समित्या, तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://raigad.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.