लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
• Appasaheb Magar
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण येथील मोरु नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलजमधील दहावी आणि बारावीच्या परिक्षेत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १०० टक्के निकालाची उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुरुवारी सत्कार केला.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण येथील मोरु नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत ज्युनीयर कॉलेज मधील दहावीच्या निकालामध्य प्रेम मुंबईकर यांने ८८.८० टके गुण प्राप्त करत प्रथम, ८७.६० टक्के मिळवत मृदुला पाटील हिने द्वितीय तर परी गुप्ता हिने ८७.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला बारावीच्या परिक्षेत राजकुमार म्हात्रे याने ७५.१७ टक्के गुण मिळवत प्रथम, केया ढवळे हीने ७३.५० टक्के मिळवत द्वितीय तर ७१ टक्के गुण प्राप्त करुन हर्ष ठाकूर याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या विद्यार्थ्यांचा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सत्कार केला या वेळी मोरु नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत ज्युनिअर कॉलजचे चेअरमन भार्गव ठाकूर, मदन पाटील, मुख्याध्यापिका प्रणिता गोळे उपस्थित होत्या,