विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा पाहणी दौरा

 विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा पाहणी दौरा 



पनवेल : पनवेल शहरातील प्रभाग क्रमांक १८ मध्ये विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आणि  सहकाऱ्यांच्या पाठपुराव्याने मंजूर केलेल्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती "ड" - प्र.क्र.१८ मधील अ.भु.क्र.१२७ अ ते १२४/२ ते अ. भु. क्र १३९ ते म्हात्रे हॉस्पिटल ते अ. भु.क्र १४२ व श्री कोटी भास्कर (वृंदावन हॉटेल) ते काळे ह्यांच्या घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे. कामाची रक्कम १ कोटी ४१ लाख ५९ हजार ७७७ आहे. येथील म्हात्रे हॉस्पिटल परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यानी केली. 

           शाळा आणि पावसाळा सुरू झालेला आहे. ठेकेदार कामात दिरंगाई करत होता. त्यास जाब विचारून तातडीने नव्याने बांधण्यात आलेल्या आर सी सी गटार बंदिस्त करण्याच्या सूचना विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यानी केल्या आहेत. खुली गटारे तातडीने बंदिस्त करण्यास सांगितले आहे. या संदर्भातील तक्रारी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्याकडे नागरिकांनी केल्या होत्या. पालिका अधिकारी संजय कटेकर यांना काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी  विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह पालिका अधिकारी संजय कटेकर, सूत्रसंचालक हरीश मोकल, प्रणिल बारटक्के, चंद्रकांत म्हात्रे, दीपक कुदळे, अविनाश मकास, दर्शन कर्डीले, रोहन गावंड तसेच येथील रहिवासी यावेळी उपस्थित होते.