दीपक क्लिनिकल लॅबोरेटरी शाखा नं.२ चे उदघाटन

 दीपक क्लिनिकल लॅबोरेटरी शाखा नं.२ चे उदघाटन



पनवेल : विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांचे सहकारी मित्र दिपक कुदळे यांनी उपजिल्हा रुग्णालय समोर सुरू केलेल्या दीपक क्लिनिकल लॅबोरेटरी शाखा नं.२ चे उदघाटन जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेल्या सेवाकार्डचे लोकार्पण विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या सेवाकार्डच्या माध्यमातून  दिपक क्लीनिकल लॅबच्या अंतर्गत ज्या वैद्यकीय तपासणी करण्यात येतात त्या सर्वांमध्ये सवलत देण्यात येणार आहे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना सोयीचे होईल.
       तसेच गरजू आणि निराधार रुग्णांसाठी नोंदणी केल्यावर रोज फळसेवा देण्याचा उपक्रमही  आजपासून सुरू केला आहे. ज्या अंतर्गत रुग्णांना मोफत फळे उपलब्ध होतील.
       विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी दीपक कुदळे आणि कुटुंबियांना शुभेच्छा देत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेविका प्रीती जॉर्ज, नगरसेविक,नगरसेविका सारिका भगत, पनवेल अर्बन बँक संचालिका श्रीमती.माधुरी गोसावी, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नंदकुमार जोशी, गुर्जर, देशपांडे सर,पनवेल अर्बन बँक संचालक अनिल जाधव, माजी शेकाप चिटणीस प्रकाश घरत, युवा नेते अतुल भगत, जॉनी जॉर्ज, सुनील म्हात्रे,हरेश मोकल, गणेश म्हात्रे, धर्मा पाटील, अभय जोशी, श्रीकांत गवळी, राकेश वगरे, कमलाकर भोईर, प्रकाश पाटील,महेश डोंगरे, सुरज बहाडकर, शिवराज साखरे, अभिजित पाटील व सहकारी यावेळी उपस्थित होते.