मग मंत्री भुजबळ , वडेट्टीवार ओबीसी समाजासाठी करतात तरी काय ? -भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा सवाल
पनवेल(प्रतिनिधी) राज्य सरकारकडून तयार केल्या जात असलेल्या ओबीसी समाजाच्या इम्पिरिकल डेटा मध्ये चुका आहेत हे उशीरा का होईना कबूल करणारे छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मंत्रीपदाचे वजन वापरून हा डेटा अचूक होण्यासाठी आता तरी प्रयत्न करावेत. नाहीतर तुमचे मंत्रीपद बिनकामाचे आहे हेच सिद्ध होईल , असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. अशा पद्धतीने डेटा सादर झाला तर सर्वोच्च न्यायालयात तो डेटा मान्य करणार नाही. तसे झाले तर विना आरक्षणाच्या निवडणुका होण्याची भीती निर्माण झाली आहे. असेही त्यांनी अधोरेखित केले आहे.