CELEBRATION चे सेलीब्रेशन

 CELEBRATION चे सेलीब्रेशन


अलिबाग(सचिन पाटील)

14 जानेवारी 2022  मकर संक्रांतीच्या दिवशी CELEBRATION या माझ्या मराठी लघु चित्रपटाचे यूट्यूब च्या माध्यमातून प्रकाशन करण्यात आले. 

या चित्रपटाची कथा- पटकथा राजश्री बोहरा लिहिली. आणि श्री प्रमोद सुर्यवंशी यांनी त्याला सुंदर दिग्दर्शन केले. वास्तव creation सोबत या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. अतिशय थोड्याच काळात या चित्रपटाला महाराष्ट्र भरातून रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सामान्य माणसाच्या जीवनात घडलेला एक हृदय द्रावक प्रसंग आम्ही या सिनेमाच्या माध्यमातून उभा केला. कोविड च्या महाभयान काळातील एक हलका फुलका प्रसंग पण त्याची परिणीती फार गंभीर. 

रसिकांनी डोक्यावर घेतलेल्या या लघु चित्रपटाला आता भारतातील अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. थोडे नव्हे तर आत्ता पर्यंत तब्बल 16 राष्ट्रीय पुरस्काराने या लघु चित्रपटाला गौरविण्यात आले आहे. 

आपल्या श्रमाचे साफल्य या पेक्षा अजून काय असावे. पहिला लघुपट आणि मोठमोठे पुरस्कार. अर्थातच आनंदाला पारावार उरला नाही. या यशात मोठे सहकार्य करणारे माझे स्नेही, दिग्दर्शक श्री प्रमोद सुर्यवंशी यांचे व वास्तव च्या संपूर्ण टीम चे मनापासून आभार आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!! 💐💐💐💐💐💐


आत्ता पर्यंत मिळालेले 16 पुरस्कार खालील प्रमाणे. 


1- साऊथ इंडियन फिल्म फेस्टिवल -(एकूण 3 अवॉर्ड)

     बेस्ट मराठी फिल्म

     बेस्ट ओरिजनल स्टोरी

     बेस्ट कॉन्सेप्ट फिल्म


2- आयकॉनिक शॉर्ट सिने अवॉर्ड - (एकूण 4 अवॉर्ड)

      बेस्ट मराठी फिल्म

      बेस्ट सोशल फिल्म

      बेस्ट प्रोमिसिंग फिल्म 

      बेस्ट एडिटिंग फिल्म 


3- रॉयल पिकॉक फिल्म फेस्टिवल. (एकूण 3 अवॉर्ड )

     बेस्ट मराठी फिल्म

     बेस्ट कॉन्सेप्ट फिल्म

     बेस्ट डायरेक्टर


4- इंडियन फिल्म फेस्टिवल - (एकूण 2 अवॉर्ड )

     बेस्ट अर्टिस्टिक वर्क 

     ज्युरी मेंशन एक्सलेन्स इन डिरेक्शन


5- गोवा फिल्म फेस्टिवल - (एकूण 1 अवॉर्ड )

      बेस्ट फिल्म अवॉर्ड


6- बायोस्कॉप फिल्म फेस्टिवल

(एकूण 3 अवॉर्ड )

       बेस्ट अंस्पायरींग डायरेक्टर

       बेस्ट डायरेक्टर रिजनल फिल्म

       बायोस्कोप रत्न अवॉर्ड


7- भारत इंडिपेंडंट सिनेमा फिल्म फेस्टिवल

(एकूण 4 अवॉर्ड)

       बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड

       बेस्ट थॉटफुल फिल्म

       बेस्ट एक्सपेरिमेंटल फिल्म

       बेस्ट प्रोडूसर


  8 - कट सिनेमा फिल्म फेस्टिवल 2022

   ( 3 अवॉर्डस)

    बेस्ट फिल्म अवॉर्ड

     बेस्ट स्टोरी फिल्म अवॉर्ड 

      बेस्ट मराठी फिल्म अवॉर्ड