नवी मुंबई महानगरपालिका- श्री गणेशोत्सव 2022 आयोनातील अटींमध्ये शिथीलता

 नवी मुंबई महानगरपालिका-

 

                                    

 

श्री गणेशोत्सव 2022 आयोनातील अटींमध्ये शिथीलता





 

सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव 2022 करिता 12 जुलै 2022 रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जाहीर आवाहन प्रसिध्द करण्यात आलेले होते. या जाहीर  आवाहनात नमूद अट क्र. 3 शिथील करून सुधारित अटी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये -

 

1.   नागरिकांनी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शक्यतो ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ (पी ओ पी) पासून घडविलेल्या श्री गणेशमुर्तींची विक्री अथवा खरेदी करु नये.

2.   ‘पीओपी’ मूर्ती ऐंवजी शाडू माती पासून घडविलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी.

3.   घरगुती श्री गणेश मूर्तीची उंची 2 फूटांपेक्षा अधिक नसावी, जेणेकरुन अशा मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे सोयीचे होईल.

4.   सार्वजनिक मंडळांच्या श्री गणेश मूर्तींची उंची देखील शक्य तितकी कमी असावी.

5.   ‘पीओपी’ पासून घडविलेल्या घरगुती श्री गणेश मूर्तीचे नैसर्गिक तलाव व जलाशयांमध्ये विसर्जन करण्यास बंदी आहे.

6.   श्री गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे आणि पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी हातभार लावून सहकार्य करावे.

 

वरील सुधारित नियम जाहीर करण्यात आले असून यापूर्वीच्या नियम व अटी तसेच त्यामधील अट क्रमांक 3 शिथील करून झालेल्या बदलाची नोंद घेऊन ‘श्री गणेशोत्सव 2022’ पर्यावरणशील पध्दतीने साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.