के.आ.बांठीया विद्यालयात आषाढी निमित्त कार्यक्रम संपन्न
पनवेल (प्रतिनिधी)- आज के.आ.बांठीया विद्यालयात आषाढी निमित्त कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमाचे वेळी प्राचार्य माळी सर, सौ माळी मॅडम , हस्ते पूजन उपप्राचार्य तिरमले सर , पर्यवेक्षक श्री . कुंभार सर , श्री . महाजन सर श्री . गोखले सर . सांस्कृतिक प्रमुख सौ .टी .एस.पाटील श्री .बडगुजर व्ही . पी , सौ . राजेशिर्के मंजू व सांस्कृतिक मंडळ तसेच कला शिक्षक श्री .पवार एस . ई .व सर्व सहकारी शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहयोगाने व म्हात्रे बंधू यांच्या संगीताने , श्री . शेळके सर यांच्या टाळ चिपळ्यांनी तर विद्यार्थी शिक्षक यांच्या अभंगांनी विठू माऊलीत सर्वजण लिन झाले . उत्तम असे सुत्रसंचालन सौ. पाटील टी . एस . मॅडम व श्री . खडतर सर यांनी केले . त्याच बरोबर सर्व चलचित्रण श्री . जंगम सर यांनी खास शैलीत केले . व मा .प्राचार्य , उपप्राचार्य यांनी यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या .