श्री क्षेत्र पंचायतन मंदिर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी,"जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा पुढाकार""

श्री क्षेत्र पंचायतन मंदिर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी,"जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा पुढाकार""


पनवेल : गुरुपौर्णिमे निमित्त जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्री क्षेत्र पंचायतन मंदिर परिसरातील श्री साई मंदिरात सकाळी संस्थेचे अध्यक्ष प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी  कुटुंबासमवेत दुग्धाअभिषेक करून गुरुपौर्णिमेची सुरुवात केली. यावेळी पनवेल मधील "प्रगती महिला भजन मंडळ घाटे आळी,पनवेल" आणि "श्री गुरुकृपा प्रासादिक भजन मंडळ, गव्हाण-कोपर" यांच्या माध्यमातून सुश्राव्य भजनसंगीत कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते . मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी पनवेलचे आदर्श नगराध्यक्ष श्री. जे.एम.म्हात्रे साहेबांच्या संकल्पने नुसार  मंदिर परिसरातून आपण आरोग्य सेवा सुद्धा वेळोवेळी भाविकांना द्यावी , त्यांच्याच प्रेरणेतून आरोग्यसेवा शिबिर आयोजित केले होते या शिबिरामध्ये शेकडो भाविकांनी आरोग्य तपासणी करून घेतली.

       दिवसभर मुसळधार पाऊस पडत होता परंतु त्यातही भाविकांची गर्दी होत होती,  जणू काही आपण करत असलेल्या सेवा कार्याला सुद्धा मुसळधार पावसाच्या रूपाने गुरू आशीर्वाद  देत होते अशा प्रकारचे भक्तीमय वातावरण सबंध परिसरात झाले होते. यावेळी त्यांच्या कुटुंबासोबतच  मित्रपरिवार सुद्धा उपस्थित होता.
       मंदिर परिसरातील हिमांशू दिलीप पाटील इंग्लिश मीडियम स्कूल  येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रमासाठी श्री.प्रितम म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, येथील उपस्थित शिक्षकांना पाहून मला माझ्या शाळेतील शिक्षक आठवले. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शाळेतील आपल्या गुरूंना गुलाब पुष्प देऊन त्यांच्या पाया पडायची आज पुन्हा एकदा आठवण झाली,त्यावेळी शिक्षकांनी जे मला मोलाचे मार्गदर्शन केले आणि वर्गातील तासाच्या वेळी जी शिकवण दिली त्यामुळेच आज मी माझ्या स्वतःच्या शाळांमध्ये विद्यार्थी घडवण्याचे कार्य आपल्यासारख्याच नव्या पिढीच्या शिक्षकांच्या माध्यमातून करत आहे याचा मला अभिमान आहे." अशाप्रकारे त्यांनी त्यांच्या शिक्षकांच्या मार्फत कृतज्ञता व्यक्त केली.
  अशा प्रकारे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून श्री क्षेत्र पंचायतन मंदिर परिसरात भक्तीसेवा आणि आरोग्य सेवेचे अनोखे संगम उपस्थित भाविकांनी अनुभवले.