कोविड बुस्टर डोससाठी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांचा पुढाकार !रीजन्सी क्रिस्ट,केसर गार्डन आणि जलवायू विहार सोसायटीतील शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
खारघर (प्रतिनिधी):खारघरमधील आपल्या प्रभागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी खारघर येथील पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ. नेत्रा किरण पाटील या कायम तत्पर असतात.रीजन्सी क्रिस्ट,केसर गार्डन आणी जलवायू विहार सोसायटीतील शेकडो नागरिकांनी कोविड बुस्टर डोस घेतला.पनवेल मनपातील भाजपच्या माजी नगरसेविका नेत्रा किरण यांच्या पुढाकाराने शनिवार व रविवारी पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून मोफत कोविड बुस्टर डोस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जलवायू विहार या सोसायटीत ज्यांनी देशसेवा केली असे सैन्यातील तिन्ही दलातील माजी सैनिक वास्तव्यास आहेत.देश सेवेतील या माजी सैनिकांसाठी देखील विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळेस अनेक माजी सैनिकांनी नेत्रा किरण पाटील यांनी आपल्या सोसायटीत कोविड लसचा बूस्टर डोस उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद दिले.
कोविड व्हॅक्सीनेशन अमृत महोत्सव अंतर्गत लस महोत्सव शिबिराचे आयोजन केल्याची माहिती नगरसेविका नेत्रा पाटील यांनी दिली दिली. खारघर येथील समाजसेवक किरण पाटील यांनी सदर शिबीर आयोजनात विशेष योगदान दिले.