नवीन शैक्षणिक धोरणांमुळे विद्यार्थ्यांना विविध पर्याय
पनवेल(प्रतिनिधी) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात अर्थात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) रायगड विभागाच्या वतीने दहावी, बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर भरारी 2022 हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते झाले.