हास्य कलाकार स्व.कमलाकर वैशपांयन यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना आदरांजली
पनवेल : आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत नाट्यगृह येथे हास्य कलाकार स्व.कमलाकर वैशपांयन यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. तसेच जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने जेष्ठ हास्य कलाकार, हास्य दरबार फेमदिलीप खन्ना, हास्य सम्राट जॉनी रावत, जादूगार श्री.बबन कुमार, निवेदक श्री.परेश दाभोलकर, इट बिट्सचे निर्माते श्री.कमलाकर बनसोडे, स्टँडअप कॉमेडियन श्री.डी. महेश, वादक श्री.अजय मातोंडकर, मिमिक्री आर्टिस्ट श्री.गुरू कदम, गायक डॉ.गव्हाते सर, खानदेशी कॉमेडियन श्री.विजय शिरसाट या कलाकारांना मानचिन्ह देऊन त्यांचे सत्कार केले. यावेळी वादक श्री.अजय मातोंडकर यांनी दिवंगत हास्य कलाकार कमलाकर वैशपांयन यांना आपल्या वादनाच्या शैलीत आदरांजली वाहिली.