इस्त्राईल तलावात आढळला मृतदेह

 इस्त्राईल तलावात आढळला मृतदेह


पनवेल दि.३० (वार्ताहर) : शहरातील इस्त्राईल तलावात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला असून याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदर इसमाचे वर्णन अंदाजे वय २५ ते ३० वर्ष, अंगाने सडपातळ, अंगात नेसुन काळया रंगाचा फुल शर्ट व निळसर रंगाची जिन्स पॅन्ट असून इस्त्राईल तलावाच्या पाण्यात पडुन मयत झाला आहे. याबाबत इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस उपनिरीक्षक अनिल राजुरे यांच्याशी संपर्क साधावा.