अमरनाथ यात्रेला गेलेल्या नातेवाईकांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास त्वरित कळवावी


अमरनाथ यात्रेला गेलेल्या नातेवाईकांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास त्वरित कळवावी




अलिबाग,दि.11(जिमाका):- यावर्षीच्या अमरनाथ यात्रा मार्गामध्ये ढगफुटी / अतिवृष्टी झाल्यामुळे यात्रेकरु अडकून पडले आहेत. त्यापैकी काही यात्रेकरु अद्याप बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले आहे.     

    रायगड जिल्हयातील नागरिक अमरनाथ यात्रेसाठी गेले असल्यास त्यांना आवश्यक मदत पोहोचविण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी त्या यात्रेकरू नातेवाइकांची नावे व संपर्क क्रमांक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास 02141-222097 व 8275152363 या क्रमांकावर तातडीने कळवावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे. 

      जिल्हा प्रशासन व राज्य शासनामार्फत आपल्या नातेवाईकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी नागरिकांनी या आवाहनास तात्काळ प्रतिसाद द्यावा,  असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.