काल कामोठे कॉलोनी फोरमच्या दणक्यानंतर मानसरोवर रेल्वे स्टेशनवरील गळके पत्रे दुरुस्त करण्याचे काम तातडीने सुरु

काल कामोठे कॉलोनी फोरमच्या दणक्यानंतर मानसरोवर रेल्वे स्टेशनवरील गळके पत्रे दुरुस्त करण्याचे काम तातडीने सुरु



कामोठा (प्रतिनिधी)- पावसामुळे होत असलेली प्रवाशांची व्यथा काल सिडको समोर मांडल्या नंतर फोरमच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती.ह्यावेळी गळके पत्रे , शौचालयातून येणारी दुर्गंधी तसेच *आपत्कालीन परिस्थितीत फायर ब्रिगेड अणि रुग्णवाहिका ह्यांच्यासाठी विशेष रस्ता बनविण्याची* मागणी फोरम कडून करण्यात आली असुन पुढील सात दिवसात सर्व कामे सिडको कडून करुन घेण्यात येतील.

ह्यावेळी कॉलोनी फोरमचे अध्यक्ष मंगेश अढाव, समन्वयक अरुण जाधव, राहुल बुधे, संदिप इथापे, रवी पाढी, भरत उतेकर, देवानंद बाठे, डॉ. वसंत राठोड, सत्यविजय तांबे उपस्थित होते.