पुढील आठवड्यात पनवेलमध्ये प्रदेश कार्यकारिणीची बैठक

 पुढील आठवड्यात पनवेलमध्ये प्रदेश कार्यकारिणीची बैठक




पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुढील आठवड्यात पनवेलमध्ये होणार असून, या बैठकीच्या पार्श्वभुमीवर श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात रायगड जिल्हा कार्यकारणीची बैठक भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार श्रीकांत भारतीय, रायगडचे माजी पालकमंत्री आमदार रविंद्र चव्हाण, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी(दि. १५) पार पडली. 
        मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या रायगड जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीलाकोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील, महिला, मोर्चा पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी उपमहापौर सीताताई पाटील, चारुशिला घरत, माजी सभागृहनेते परेश ठाकूर,  जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, दीपक बेहेरे, भाजपचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, युवामोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते. यावेळी आमदार रविंद्र चव्हाण, प्रशांत ठाकूर आणि श्रीकांत भारतीय यांनी प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीच्या पार्श्वभुमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना केल्या.. दरम्यान वेळी विधान परिषदेचे नवनिर्वाचीत आमदार श्रीकांत भारतीय यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.