वहाळ ग्रामपंचायत सदस्य चेतन घरत यांची भाजपातून हकालपट्टी
पनवेल(प्रतिनिधी) पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे वहाळ ग्रामपंचायतीचे सदस्य चेतन रामचंद्र घरत यांची भारतीय जनता पार्टीतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
वहाळ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर सदस्य म्हणून चेतन घरत विजयी झाले होते. मात्र त्यांनी सतत पक्षविरोधी कारवाई केली आहे. त्याचबरोबर पक्षाला कोणतीही सुचना न देता भाजपचे वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव चेतन घरत यांनी आणला. त्यामुळे विरोधी पक्षाला चेतन घरत यांनी उघडपणे सहकार्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षविरोधी कारवायांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचे काम चेतन घरत यांनी करत त्या विभागात पक्षाचे खच्चीकरण करण्याचे जाणूनबुजून काम केले. या संदर्भात वारंवार समज देऊनही चेतन घरत यांनी त्यांच्या वर्तनात सुधारणा न केलेल्या भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सुचनेनुसार तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी चेतन घरत यांचे सहा वर्षांसाठी निलंबन करून पक्षातून हकालपट्टी केली आहे.