पनवेल मनपाचे मा.सभापती,नगरसेवक अभिमन्यूशेठ पाटील यांना पित्रशोक
खारघर (प्रतिनिधी)-काल रविवार दिनांक १७ जुलै २०२२ रोजी सकाळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती,नगरसेवक अभिमन्यूशेठ पाटील यांचे वडील श्री.धर्मा सुदाम पाटील यांचे वृद्धापकाळाने मुर्बी गाव,सेक्टर-१९,खारघर येथील राहत्या घरी अल्पशः आजाराने निधन झाले.ते ९३ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी गं.भा.मनुबाई धर्मा पाटील,मुले अभिमन्यूशेठ पाटील,संजय धर्मा पाटील,तसेच मुली-सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कालच दुपारी १-०० वाजता मुर्बी गाव स्मशानभूमीत हजारो आप्तस्वकीय,नातेवाईक,मित्र-परिवार आणी नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावरती धार्मिक विधीसह शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.दशक्रिया विधी श्री क्षेत्र नाशिक येथे मंगळवार दिनांक २६ जुलै २०२२ रोजी होणार असून उत्तर कार्य विधी शुक्रवार दिनांक २९ जुलै रोजी मुर्बी गावातील राहत्या घरी होणार आहे.