श्री अमरनाथ सेवा मंडळ पनवेलने वाहिली ढगफुटीने मृत्युमुखी झालेल्या यात्रेकरूंना श्रद्धांजली
पनवेल दि.०९ (संजय कदम) : दक्षिण काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुंफेच्या पायथ्याशी असलेल्या यात्रातळानजीक ढगफुटी झाल्याचे सुमारे १६ जणांचा मृत्यूू झाला असून ४० जण बेपत्ता आहेत. या अपघाताने मृत्युमुखी झालेल्या यात्रेकरूंना श्री अमरनाथ सेवा मंडळ पनवेलने शोक व्यक्त करीत त्यांच्या कुटूंबियाच्या दुःखात सहभागी असल्याचे संस्थापक अध्यक्ष सुनील अचोलकर यांनी म्हटले आहे.
जम्मू काश्मीर मधील अमरनाथ गुंफेच्या परिसरात शुक्रवारी सायंकाळी भीषण ढगफुटी झाली. यात ढगफुटीमुळे परिसरात पाण्याचे मोठे लोंढे तयार झाल्याने यात्रेसाठी आलेल्या भाविकांचे तंबू वाहून गेले तसेच सामुदायिक किचनचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच भाविकांचा यात मृत्यू झाला आहे. या सर्व घटनेबाबत श्री अमरनाथ सेवा मंडळ पनवेलने शोक व्यक्त करीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटूंबियाच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.