गुरुवारी पनवेलमध्ये 'भेटला विठ्ठल माझा' सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल
पनवेल(प्रतिनिधी) आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्यावतीने गुरुवार दिनांक १४ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता पनवेलमध्ये 'भेटला विठ्ठल माझा' सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल आयोजित करण्यात आली आहे.
पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणाऱ्या या कार्यक्रमात मराठी इंडियन आयडॉल स्पर्धेचा विजेते सागर म्हात्रे यांचा विशेष सत्कार तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील निवडक गुरुजनांचा सत्कार करण्यात येणार आहे. गायक मेघना भावे, नचिकेत देसाई, प्रणय पवार, वादक म्हणून विवेक भागवत, मनीष डुंबरे, प्रणव हरिदास, समीर कर्वे, विशाल माळी, झंकार कानडे तर निवेदक म्हणून स्नेहल दामले यांचा सहभाग या मैफलीत असणार आहे. हा कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून मोफत प्रवेशिकेसाठी निखिल गोरे ८०९७२४८८७७ किंवा कौस्तुभ सोमण ९६१९४४१३६७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.