श्री साई नारायण बाबा आश्रम यांच्या मार्फत ८३ वा शास्त्रयुक्त कन्यादान सोहळा

श्री साई नारायण बाबा आश्रम यांच्या मार्फत ८३ वा शास्त्रयुक्त कन्यादान सोहळा 


पनवेल दि.०५ (संजय कदम ) : पनवेल येथील  श्री साई नारायण बाबा आश्रम  व श्री भगवती साई संस्थान यांच्या वतीने ८३ वा शास्त्रयुक्त कन्यादान  सोहळा शनिवार दिनांक ०९ जुलै २०२२ रोजी आयोजित करण्यात आला आहे . 

                    सद्गुरू श्री साई नारायण बाबा यांच्या आशीर्वादाने ८३ वा शास्त्रयुक्त कन्यादान सोहळा श्री साई बाबा मंदिर स्टेशन रोड पनवेल येथे आयोजित करण्यात आला असून, अंत्यत शास्त्रयुक्त पद्दतीने हा सोहळा संपन्न होणार असून या ठिकाणी या कन्यादान सोहळ्या निमित्त येणारा  सर्व खर्च  श्री साई नारायण बाबा आश्रम  व श्री भगवती साई संस्थान यांच्या वतीने करण्यात येणार आहे . तरी वधू - वराना आशीर्वाद देण्यासाठी सर्वानी उपथित रहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे .