देवशयनी आषाढी एकादशी दिंडी
कामोठा (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील आणि सौ. भारती पाटील यांनी कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला सदिच्छा भेट दिली. देवशयनी आषाढी एकादशी निमित्त विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दिंडीत त्यांनी तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सहभाग घेतला. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी डॉ. अनिल पाटील आणि सौ. भारती पाटील यांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे ऑडिटर शिवलिंग मेनकुदळे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, बाळासाहेब कारंडे, मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हा त्रे व अर्चना खाडे आदी उपस्थित होते.