सचिन तेंडुलकर मैदानावरील स्टेज आणि काही निवडकच स्पोर्ट्स कोर्टचे काम थांबवण्याचे आदेश

सचिन तेंडुलकर मैदानावरील स्टेज आणि काही निवडकच स्पोर्ट्स कोर्टचे काम थांबवण्याचे आदेश

*मनपा आयुक्त गणेश देशमुख यांची सकारात्मक भूमिका*

कॉलनी फोरमच्या पाठपुराव्याला यश


पनवेल /प्रतिनिधी:- खारघर सेक्टर 21 मधील, भूखंड क्रमांक 42 वर असलेल्या सचिन तेंडुलकर मैदानावर स्टेज आणि इतर स्पोर्ट्स कोर्ट बनवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र संपूर्ण मैदानात विविध खेळासाठी उपलब्ध असावे, अशा प्रकारची मागणी आजूबाजूच्या सोसायट्यातील रहिवासी आणि स्थानिक खेळाडूंनी केली होती. याकरीता कॉलनी फोरमने पाठपुरावा केला. त्याची दखल घेत महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी हे काम थांबवण्याचे आदेश दिले.  तेथील नागरिकांच्या जनभावना लक्षात घेऊन फक्त खेळाचे मैदान या ठिकाणी विकसित केले जाणार असल्याची ग्वाही आयुक्तांनी दिली असल्याची माहिती फोरमचे समन्वयक मधु पाटील यांनी दिली.

सचिन तेंडुलकर यांच्या नावाने ओळखले जाणारे हे मैदान खुले आहे. त्यामुळे येथे स्थानिक खेळाडू वेगवेगळे खेळ खेळतात. मात्र

पनवेल महानगरपालिकेकडून  या मैदानावर स्टेज बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्याकरीता मोठ्या प्रमाणात जागा व्यापली जाणार होती . त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी जागा शिल्लक राहणार नव्हती. या व्यतिरिक्त लॉंग टेनिस, बास्केट बॉल, फुटबॉल, कबड्डी आणि बॅडमिंटन कोर्ट अशा प्रकारचे कोर्ट एकदम दाटीवाटीने याठिकाणी उभारले जाणार होते, तसेच क्रिकेटची खेळपट्टी या ठिकाणी तयार करण्याचे नियोजन होते . त्यामध्ये हा भूखंड विभागला जाण्याची चिन्हे दिसत होते.

वास्तविक पाहता येथे प्लेन ओपन ग्राउंड सर्वच खेळासाठी उपलब्ध असावे अशा प्रकारची मागणी आजूबाजूच्या सर्व सोसायट्यांची आहे. जेणेकरून मुलांना या ठिकाणी ठराविकच नाही, तर कोणतेही खेळ खेळता येतील. त्याचबरोबर येथे स्टेज बांधल्यानंतर भविष्यात राजकीय तसेच सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचा एक प्रकारे पायंडा पडण्याची शक्यता होती . त्यामुळे या ग्राउंडचा उद्देश आणि हेतू साध्य होणार नाही. 

या सर्व दृष्टिकोनातून विचार करून कॉलनी फोरमच्या वतीने महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची मंगळवारी भेट घेण्यात आली. यावेळी कॉलनी फोरमच्या संस्थापिका लीना अर्जून गरड, फोरमचे समन्वयक मधु पाटील, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिकांची मागणी, त्यांची याबाबतची असणारी जनभावना आयुक्तांपर्यंत पोहोचवण्याचे काम कॉलनी फोरम च्या वतीने करण्यात आले. त्यानंतर लागलीच सचिन तेंडुलकर मैदानावरील स्टेजचे काम त्वरित थांबवण्याचे आदेश यावेळी संबंधित ठेकेदारला देशमुख यांनी दिले.  येथील रहिवाशांच्या मागणीनुसार कॉलनी फोरमने केलेल्या पाठपुराव्याची आयुक्तांनी दखल घेतली.

या भूखंड क्रमांक 42 वर फक्त प्ले ग्राउंड करण्यात यावे. या ठिकाणी एक चेंजिंग रूम, युरीन ब्लॉक, सिडकोकडून पाण्याची जोडणी तसेच बोरवेअलची सोय करण्यात यावी तसेच मैदानातील जागेचा काही स्पेसिफिक खेळासाठीच्या व्यावसायिक वापर टाळण्यात यावा अशी न्यायपूर्ण मागणी रहिवाशांनी केली गेली होती. *कारण नवी मुंबई महानगरपालिका हद्दीमधील बेलापूर येथे राजीव गांधी स्टेडियम उभारण्यात आलेले आहे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या स्टेडियमच्या आजूबाजूच्या सेक्टर मधील खेळाडूंना आता पैसे दिल्याशिवाय या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वर प्रवेश मिळत नाही तसा प्रकार खारघर मध्ये होण्याचा खूप मोठा धोका आहे.*

 आजूबाजूच्या सोसायट्यांचे पत्र कॉलनी फोरमलाला प्राप्त झाले होते. ही मागणी सुद्धा महापालिका आयुक्त गणेश देशमुख साहेब यांनी मान्य केली असल्याचे मधु पाटील यांनी सांगितले. त्यामुळे या मैदानावर फक्त प्लेग्राउंड होणार असून, महापालिका प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करत असल्याचे  पाटील म्हणाले. यावेळीसेक्टर २१ मधील ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष  विनायक आव्हाड व सदर मैदानात खेळणारे खेळाडू चे प्रतिनिधी डाॅ. स्वामीनाथ ढवळे उपस्थित होते.

मुलांना खेळाडूंना खेळण्यासाठी खुल्या क्रिडांगणाची आवश्यकता आहे. असे असताना सचिन तेंडुलकर मैदानात चक्क स्टेज बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. इतकेच नाही तर स्थानिक रहिवाशांचा विरोध असतानाही या ठिकाणी काही निवडकच खेळांचे कोर्ट बांधले जाणार होते. त्यामुळे या मैदानाची विभागणी होऊन खेळण्यासाठी जागा खुली राहणार नव्हती. या पार्श्वभूमीवर कॉलनी फोरमने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. यासाठी आयुक्त गणेश देशमुख यांची सुद्धा भेट घेतली. त्यांनी आमची मागणी मान्य करत हे काम थांबवण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. त्यामुळे या ठिकाणी ओपन प्ले ग्राउंड उपलब्ध होणार आहे.

लीना अर्जून गरड

संस्थापिका 

खारघर फोरम