कामगारनेते महेंद्र घरत यांच्या NMGKS संघटनेच्या माध्यमातून तब्बल ११,०००/- रुपये पगारवाढ

 

कामगारनेते महेंद्र घरत यांच्या NMGKS संघटनेच्या माध्यमातून तब्बल ११,०००/- रुपये पगारवाढ




नवी मुंबई (प्रतिनिधी)-मे.रायटर बिझनेस सर्व्हिसेस महापे मधील कामगारांच्या पगारवाढीचा प्रश्न बरेच महिने प्रलंबित होता. व्यवस्थापन संघटना नको म्हणून पगारवाढ करण्यास तयार नव्हते. परंतु न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या सातत्याच्या प्रयत्नांना यश येऊन, कामगार आयुक्त ठाणे यांच्या उपस्थितीत दिनांक २५ जुलै २०२२ रोजी पगारवाढीचा करार करण्यात आला. या करारनाम्यानुसार कामगारांना तीन वर्षांसाठी तब्बल ११,०००/- रुपये पगारवाढ करण्यात आली. तसेच दोन ग्रॉस सॅलरी बोनस, २५ लाख रुपयांची अक्सिडेंटल पॉलिसी देण्याचे मान्य करण्यात आले. बरेच दिवसानंतर कामगारांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून मार्गी लागल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

         हा करारनामा कामगार उपायुक्त ठाणे श्री. दाभाडे साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष श्री. महेंद्रशेठ घरत, कार्याध्यक्ष पी. के. रामण, सरचिटणीस श्री. वैभव पाटील, कामगार प्रतिनिधी श्री. आर. ए. चौरे, श्री. धर्मेंद्र जोशी, श्री. संतोष पाटील, श्री. माणिक लोंढे, श्री. जीवन भोईर तर व्यवस्थापनातर्फे श्री. जो ब्रिस्टन हे उपस्थित होते.