आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ
पनवेल(प्रतिनिधी) पनवेल मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्याअंतर्गत पनवेल महापालिकेच्या तत्कालीन नगरसेविका व माजी उपमहापौर चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीमधून सेक्टर 16 येथील उद्यानामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या विविध सुविधांचा तसेच हायमास्ट, रस्त्याचे करण्यात आलेल्या काँक्रिटीकरचे लोकार्पण व भुमीपूजन तसेच ई कार्डचे वाटप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.