'हर घर तिरंगा' अभियान

 'हर घर तिरंगा' अभियान

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात आजपासून 'हर घर तिरंगा' या अभियानाची सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज त्यांच्या पनवेल येथील निवासस्थानी सन्मानपूर्वक तिरंगा ध्वज फडकवला. तसेच या राष्ट्रीय उत्सवात तमाम नागरिकांनी सहभागी व्हावे. राष्ट्रध्वजाचा मान सन्मान राखून आप आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.