सीकेटी महाविद्यालयात प्लेसमेंट पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम

 सीकेटी महाविद्यालयात प्लेसमेंट पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम

                   


                                     

पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज  न्यू पनवेल (स्वायत्त) येथे प्लेसमेंट पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम शनिवारी महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने रुसा अंतर्गतप्लेसमेंट सेल, अतर्गत गुणवत्ता हमी कक्षा आणि TATA STRIVE यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे Soft Skill Facilitator, TATA STRIVE च्या मा. स्नेहा सारस्वत व BFSI Facilitator, TATA STRIVE चे मा. अबरार शेख उपस्थीत  होते. या प्रशिक्षणासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.एस.के.पाटीलआयक्यू. सीसमन्वयक  डॉ बीडीआघाव ,रुसा समन्वयक डॉ. शैलेश वाजेकर व प्लेसमेंट सेल चे प्रमुख प्रा. एस.एस.कांबळे  यांनी उपस्थिती दर्शविली 

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉएस.के.पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना महाविद्यालयाच्या कीर्तीचा मागोवा घेतला. तसेच महाविद्यालयात प्लेसमेंटसाठी कोणकोणते कार्यक्रम राबविले जातात हे वर्तविले . या कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. एस.एस.कांबळे यांनी केली. प्रमु पाहुणे मा. स्नेहा सारस्वत यांनी बायोडेटा कसा तयार करावा व त्याचे कोण कोणते प्रकार आहेत, मुलाखत कशी दयावी , व्यक्तिमत्वाचे विविध प्रकार आणि त्यांचे उपयोजन मुलाखतीत कसे  करावे याबद्दल माहिती दिली. या प्रशिक्षणात  २५० विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. या बद्दल त्यांना प्रमाण पत्र देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणकीय विज्ञान विभागाच्या प्रा. आरती परदेशी यांनी केले तसेच सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रा. अन्वेश वेमुला यांनी या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉएस. के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रा. एस.एस.कांबळे  यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर  प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगतव्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुखसचिव मा. डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.