बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले! कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी गव्हाणफाटा, गव्हाण एस. टी. मार्ग पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी उपलब्ध करून दिला तब्बल ८ कोटींचा निधी

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले!

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी गव्हाणफाटागव्हाण एस. टी. मार्ग पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी उपलब्ध करून दिला तब्बल ८ कोटींचा निधी


सिडको मार्फत विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकरिता उलवे नोड पॅकेज -३ विकसित करताना जिल्हा परिषदेचा ७० वर्षे जुना एस. टी. तसेच गव्हाण,जावळे,शेलघरन्हावा,न्हावाखाडीकोपरशिवाजीनगर ग्रामस्थांच्या रहदारीचा रस्ता उध्वस्त केला.त्यावेळी स्थानिकांनी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली विरोध केला. कामगार नेते महेंद्र घरत यांनी सिडको एम.डी. व राष्ट्रीय महामार्गप्रोजेक्ट डायरेक्टर यांच्यासोबत बैठक करून  ग्रामस्थांची मागणी पूर्ण करण्यासाठी आग्रह धरला. आम्रमार्गाच्या रचनेनुसार सर्व ग्रामस्थांना उलवे नोड मधूनच जावे लागेल असे सांगितले गेले.यावर आम्हाला आमच्या एस. टी. रहदारीचा मार्गगव्हाणफाटा – जावळे – शेलघर मार्गे असावा हि मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. यासाठी राष्ट्रीय महामार्गाला भूयाराचे नियोजन करणे आवश्यक होते. यासाठी २ कोटीचा खर्च तर गव्हाणफाटा – जावळे मार्गांसाठी ६ कोटीचा खर्च अपेक्षित होता. तसेच राष्ट्रीय महामार्ग कास्टिंग  यार्ड सुद्धा ४ वर्षे रस्त्यांच्या मार्गात येत होता. शेवटी राष्ट्रीय महामार्ग व  सिडको महामंडळाने संयुक्तपणे खर्च करण्याचे ठरले. भूयाराचे काम मार्गी लागले व राष्ट्रीय महामार्ग – प्रोजेक्ट डायरेक्टरने रस्त्याचे कामासाठी निधी शिल्लक नसल्याचे सांगितले. जावळेगव्हाण ग्रामस्थ तर कामगार नेते महेंद्र घरत यांना वारंवार विचारत होतेकधी होणार रस्त्यांचे कामशेवटी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांना वस्तुस्थिती सांगितली कीसिडको नोडल विकासामुळे ग्रामस्थांचा रस्ता तोडला गेला व नाहक गोरगरीब प्रवाशांना उलवामार्गे हेलपाटा होत आहे व त्याचा भुर्दंड प्रवाशांना होत आहे. तातडीने एम. डी. मुखर्जी साहेबांनी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला व १ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर कॉन्ट्रॅक्टरला वर्कऑर्डर देण्यात आली व २० तारखेला पवित्र श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर रस्त्याचा भूमिपूजन सर्वपक्षीय नेत्यांना एकाच व्यासपीठावर बोलावून होत आहे.

                   सिडको एकूण उलाढालीच्या ५% रक्कम प्रकल्पग्रस्त गावांच्या विकासासाठी देण्याचा करार प्रकल्पग्रस्थांचे नेते स्वर्गीय दि. बा. पाटील साहेब यांनी केला होता. दि. बा. पाटील साहेबांचे स्वप्नउरलेले काम पूर्ण करण्यासाठी महेंद्र घरत अहोरात्र झटत आहेत. अनेक प्रकल्पग्रस्त गावांना खेळाची मैदानेसमाजमंदिरेकॉक्रीट रस्तेपाण्यासाठी जलकुंभजिल्हा परिषद शाळांसाठी नवीन इमारतीभुयारी गटारे अशी अनेक कामे सिडको नागरी सुविधांच्या माध्यमातून निर्माण करून त्यांनी याची प्रचीती दिलेली आहे.

               प्रत्येक गावातीलतालुक्यातील नेत्यांनी आपल्या समाजाच्या उन्नत्तीचे स्वप्न पाहिले तर सर्व गावांचा विकास झाल्याशिवाय रहाणार नाही व स्वर्गीय दि. बा. पाटील साहेबांना हीच खरी श्रद्धांजली होईल.