खारघरला मुंबईमधून येणाऱ्या डेब्रीजचा विळखा-पनवेल महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष्य

खारघरला मुंबईमधून येणाऱ्या डेब्रीजचा विळखा-पनवेल महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष्य 



खारघर(प्रतिनिधी)-सध्या खारघर हे मुंबईमधील डेब्रीज माफियांना सुरक्षित डंपिंग ग्राउंड म्हणून उदयास येत आहे.मुंबईमधील डेब्रीज हे विल्हेवाट लावण्यांसाठी काही माफियांनकडून १० हजार रूपयांना १ गाडी याप्रमाणे खरेदी केले जाते आणि मध्यरात्रीनंतर खारघमधील खाडी किनारी,मोकळ्या प्लाॕटवरती,गोल्फ कोर्सच्या आतील धामोळे गावाच्या परिसरात तसेच रस्त्यांच्या कडेला बीनदिक्कत टाकले जात असून असा अवैध व्यवसाय करणाऱ्या अनेक टोळ्या मुंबईत सक्रीय असण्याची शक्यता आहे.

      अशा डेब्रीज माफियांनमुळे हे २१ व्या शतकातील खारघर शहर विद्रुप होत असून या माफियांनवरती पनवेल महापालिका प्रशासनाचा कोणताही अंकुश नाही.काल आमच्या प्रतिनिधींनी अशा दोन गाड्या खारघमध्ये डेब्रीज खाली करीत असताना अडविल्या असता,कोणीतरी अनिल उपाध्याय नावाची व्यक्तीकडून हे डेब्रीज मुंबईतून खरेदी करून खारघमध्ये विल्हेवाट लावली जात असल्याचे वाहन चालकाने आमच्या प्रतिनिधीला सांगीतले.नंतर तेथून त्या वाहन चालकांनी वाहनासह पोबारा केला.या गाड्यांचे आर.टी.ओ.रजिस्ट्रेशन,प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र आणि वहातुक कर तपासणी करणे गरजेचे असून त्रुटी आढळल्यास जप्तीची कारवाई होणे गरजेचे आहे.

    या डेब्रीज माफियांनवरती कठोर आणि दंडात्मक कारवाई करून,वाहने जप्त करावी आणि वाहन चालक तसेच या डेब्रीज माफियांनवरती  एफ.आय.आर.दाखल करण्याची मागणी खारघमधील दक्ष नागरीक आणि पर्यावरण प्रेमींच्याकडून केली जात आहे.


कोट


खारघरच नव्हे तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोणालाही कोठेही डेब्रीज खाली करण्याची परवानगी महापालिकेने दीली नसून अशाप्रकारे कोठेही डेब्रीज खाली करणाऱ्या गुन्हेगारांवरती दंडात्मक,जप्तीची आणि फौजदारी कारवाई करण्यास प्रशासन कटिबद्ध आहे.दक्ष नागरिक आणि पत्रकारांनी अशा घटना घडत असताना प्रभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.


                           श्री.अनिल कोकरे

स्वच्छ भारत अभियान प्रमुख,पनवेल महानगरपालिका

वहातुक शाखेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता,तो होऊ शकला नाही.