कॉलनी फोरमच्या मालमत्ता करा बाबतच्या सुनावणीचे अपडेट
खारघर (प्रतिनिधी)- माननीय उच्च न्यायालय मध्ये आज खारघर कॉलनी फोरम आणि कामोठे कॉलनी फोरम यांच्या वतीने, ॲड. समाधान काशीद साहेब आणि ॲड. लिमये साहेब हे हजर राहिले. आपल्या याचिका आजच्या बोर्डवर सिरियल नंबर 27 वर सुनावणी ठेवण्यात आलेली होती. परंतु सदरचा सिरियल नंबर 27 हा उशिरा असल्याने, आज सुनावणी होण्याची शक्यता कमी असल्याने, आज दुपारी 2.30 वाजता आपल्या वतीने, आपली रिट याचिका पूर्वलक्षी कराबाबतची असल्याने, यापूर्वीच्या बेंचने आपली याचिका हाय ऑन बोर्ड सुनावणीसाठी ठेवण्यात आलेले होती.
त्यामुळे आपली याचिका लवकरात लवकर सुनावणीस घेऊन, हाय ओन बोर्ड ठेवण्याची विनंती केली.सदरची विनंती माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर डी धानुका आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठाने मान्य करून आपल्या याचिका पुढील गुरुवारी HIGH ON BOARD ठेवली आहे.
*लीना अर्जुन गरड,*
*मा.नगरसेविका व अध्यक्ष कॉलनी फोरम*