घरोघरी तिरंगा,दारोदारी व्हॅक्सिनेशन आणि आरोग्य सेवा"";स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रितम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साजरा

घरोघरी तिरंगा,दारोदारी व्हॅक्सिनेशन आणि आरोग्य सेवा"";स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रितम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साजरा


पनवेल : 15 ऑगस्ट 2022 रोजी संपूर्ण भारत देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा यानुसार प्रत्येक जण मोठ्या जल्लोषाने स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. या स्वतंत्राच्या उत्सवात पनवेल मधील नागरिक सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभाग घेत  आहेत. पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्षनेते आणि शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा खजिनदार प्रितम म्हात्रे हे नागरिकांना कोरोना काळातील लॉक डाऊन पासून विविध प्रकारे आरोग्य सेवा देत आहेत.

          स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संदर्भात आपले विचार व्यक्त करताना प्रितम म्हात्रे यांनी सांगितले "सध्याचे कोरोनाचे पेशंट पाहता "घरोघरी तिरंगा" या सोबतच नागरिकांच्या सेवेसाठी त्यांच्या सोसायटीमधील आवारात व्हॅक्सिनेशन शिबिर पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवण्यात आम्ही पुढाकार घेतला आहे. या अगोदर जून महिन्यामध्ये आम्ही नागरिकांसाठी घरोघरी "आरोग्यसेवा कार्ड" ज्यामध्ये नागरिकांना रक्त तपासणीवर 50% पर्यंत सवलत, माफक दरात एक्स-रे, O.P.G. आणि E.C.G. सेवा, सवलतीच्या दरात रुग्णवाहिका सेवा, तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयामध्ये गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मोफत फळसेवा अशा प्रकारच्या आरोग्य सेवा आम्ही शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या पुढाकाराने सुरू केलेल्या आहे.
        आज महाराष्ट्रातील जनता राज्यात सुरू असलेले राजकारण पाहत आहे या अशा परिस्थितीत सुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून श्री.प्रितम म्हात्रे यांनी 20% राजकारण आणि 80% समाजकारण या वृत्ती प्रमाणे जनसेवा सुरू ठेवली आहे हे पाहून बरे वाटते असे मनोगत ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रातील तरुण युवा नेत्यांनी प्रितम म्हात्रेंचा "दारोदारी आरोग्य सेवा" हा आदर्श समोर ठेवून जनतेला आरोग्य सेवा देण्यास प्राधान्य द्यावे असे मत पनवेलकरांनी व्यक्त केले. आरोग्य सेवा , शैक्षणिक सेवा , आध्यात्मिक सेवा या सर्वांमध्ये नेहमीच पनवेलचे मा.नगराध्यक्ष श्री जे.एम. म्हात्रे म्हणजेच भाऊ यांचे चिरंजीव श्री.प्रितम म्हात्रे यांची जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था नागरिकांसाठी नेहमीच पुढाकार घेत असते. 

कोट
15 ऑगस्ट 2021 रोजी म्हणजेच गेल्या एक वर्षापासून आम्ही पनवेल शहरात विविध ठिकाणी "आरोग्यसेवा आपल्यादारी" हा उपक्रम सुरू केला आहे. त्यामध्ये आमच्या आरोग्य सेविका घरोघरी जाऊन नागरिकांची आवश्यक ती आरोग्य तपासणी करत आहेत जी सेवा यापुढेही मी सुरू ठेवणार आहे.:- प्रितम जनार्दन म्हात्रे