तुर्भे विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले
नवी मुंबई (प्रतिनिधी)- नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील तुर्भे विभागाअंतर्गत श्री. संतोष सावळाराम भोईर (अनधिकृत बांधकामधारक) यांनी घर क्रमांक 05 च्या मागे मोकळा भुखंड सानपाडा या ठिकाणी महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते. सदर अनधिकृत बांधकामास डी विभाग कार्यालय, तुर्भे यांचेमार्फत महाराष्ट्र नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. अनाधिकृत बांधकामधारकाने सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.