"श्री गणेश विसर्जनाच्या वेळी योग्य त्या उपाययोजना करा"-प्रितम म्हात्रे यांनी घेतला विसर्जन स्थळी पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा

"श्री गणेश विसर्जनाच्या वेळी योग्य त्या उपाययोजना करा"-प्रितम म्हात्रे यांनी घेतला विसर्जन स्थळी पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा


पनवेल : लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सव हा पनवेल मध्ये मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. भक्ती भावाने श्री गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणून त्याचे पूजन केले जाते. त्यामुले प्रितम म्हात्रे यांनी  विसर्जन स्थळी पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला.

     पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ठीक ठिकाणी बाप्पाच्या विसर्जनासाठी तलावांवर भाविकांची गर्दी होते. अशावेळी भाविकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपायोजना करण्यासाठी आज पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते श्री प्रीतम म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी श्री.शैलेश गायकवाड,श्री.प्रीतम पाटील, श्री.प्रकाश गायकवाड व इतर विभागीय अधिकारी यांच्या समवेत त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांसोबत विसर्जनाच्या निमित्ताने पाहणी दौरा केला जेणेकरून काही उपाययोजना करावयाच्या असल्यास आपल्याला अजून कालावधी आहे. नागरिकांना बाप्पाला निरोप देताना कोणत्याही अडचणी येणार नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे.
         यावेळी विसर्जनाच्या वेळी जे मोठे तराफे आहेत ते नादुरुस्त अवस्थेत आहेत ते त्वरित दुरुस्त करून घ्यावे, जेणेकरून गेल्यावेळी त्यामधील काही ड्रम फुटून दुर्घटना होण्यापासून थोडक्यात निभावले होते तसा प्रसंग पुन्हा येणार नाही. तसेच सदर संपूर्ण परिसरात भरपूर प्रमाणात शेवाळ आणि चिखल साचल्यामुळे त्या ठिकाणी त्वरित स्वच्छता करण्यात यावी. बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी प्रत्येक भाविक वेगवेगळी आरती करतात अशावेळी पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून बाप्पाच्या विसर्जनासाठी भाविकांना घाई केली जाते, यावर आपण जर पनवेल महानगरपालिकेतर्फे साऊंड सिस्टिम आणि आरतीची व्यवस्था केली तर येणाऱ्या सर्व बाप्पांच्या मूर्ती एकत्रित करून एक संयुक्त मोठी महाआरती आपल्याला सतत काही मिनिटांच्या अवधीमध्ये करता येईल जेणेकरून बाप्पाचे विसर्जन भाविकांच्या मनाप्रमाणे गोंधळ न करता होईल अशा प्रकारची सूचना त्यांनी मांडली. तसेच याप्रसंगी वडाळे तलाव येथे सुरक्षारक्षक असतात त्यांना सुद्धा लाईफ गार्ड जॅकेट आणि इतर सुरक्षतेतेचे साहित्य पनवेल महानगरपालिकेने उपलब्ध करून द्या जेणेकरून एखादी व्यक्ती चुकून पाण्यात पडली तर तिला वाचवण्यासाठी सदरचे सुरक्षारक्षकही तयार असतील. विसर्जन स्थळी मंडप आणि लाईट यांची व्यवस्था सुद्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पालिका कशा प्रकारे करणार आहे याचा आढावा त्यांनी घेतला.
    यावेळी त्यांच्यासोबत नगरसेविका सौ प्रीती जॉर्ज, शेकाप युवा नेते श्री मंगेश अपराज, मंगेश भोईर ,जॉनी जॉर्ज, नरेश मुंडे ,प्रकाश घरत व स्थानिक रहिवासी युवक उपस्थित होते.

कोट
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व तलावांच्या बाबतीत या उपायोजना करण्यात याव्या अशा प्रकारची सूचना मी आज संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना केली आहे जेणेकरून सर्व भाविकांना विसर्जनाच्या वेळी कोणतीही अडचण येणार नाही: -श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे