कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन' कार्यक्रम

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन' कार्यक्रम

गोवा राज्यातील सुप्रसिद्ध गायिका मुग्धा गावकर यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन 




पनवेल(प्रतिनिधी) भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, नादब्रम्ह साधना मंडळ खारघर आणि पनवेल तालुका सांस्कृतिक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने 'शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन' कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 
          शुक्रवार दिनांक ०५ ऑगस्ट रोजी सायंकाळी हा कार्यक्रम शहरातील मार्केट यार्डमधील शेती. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी ५. १५ वाजता भजन स्वरपुष्प कार्यक्रम होणार असून दीपप्रज्वलन कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर, सुप्रसिद्ध डॉ. गिरीश गुणे, भजनसम्राट ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी, उस्ताद अजिम खान, ह. भ. प. नंदकुमार कर्वे, सिडको युनियन सेक्रेटरी जे. टी. पाटील, खारघर भाजपचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, वसंतशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 
           सायंकाळी ५. ३० वाजता गोवा राज्यातील सुप्रसिद्ध गायिका मुग्धा गावकर यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना हार्मोनियमवर वरद सोहनी, तबला साथ रामदास म्हात्रे, पखवाज मधुकर धोंगडे, तर गुरुदास कदम यांची टाळवर साथ असणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६. ४५ वाजता भजनसम्राट ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी आणि नादब्रम्ह साधना मंडळ शिष्य परिवार यांच्या गायनाने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. त्यानंतर ०७ वाजता आयोजकांच्यावतीने आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिष्टचिंतन होणार असून या सुरेल संगीतमय कार्यक्रमाचा रसिक श्रोत्यांनी लाभ, घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक सुप्रसिद्ध गायक रायगड भूषण पंडित उमेश चौधरी यांनी केले आहे.