मुक्या जनावरांची हत्या करणाऱ्यास केले गजाआड

 मुक्या जनावरांची हत्या करणाऱ्यास केले गजाआड 


पनवेल दि . १४ ( वार्ताहर ) :  पनवेल जवळील पुष्पक नगर परिसरात मुक्या जनावरांची हत्या करणाऱ्या एका आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . या आरोपीवर यापूर्वी अश्या प्रकारचे १३ गुन्हे दाखल आहेत . 

                         नागोठणे व रोहा येथून एक गाय व एक बैल या मुक्या जनावरांना इंजेक्शन मारून बेशुद्ध करून त्यांना इनोव्हा गाडी तुन पनवेल जवळील पुष्पक नगर येथे आणून त्यांची हत्या केल्याने याबाबतची माहिती स्थानिक रहिवाशांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना माहिती दिली त्यानुसार त्याच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अभयसिंह शिंदे,पोहवा रविंद्र राऊत,पोना परेश म्हात्रे,पोना महेंद्र वायकर,पोना विनोद देशमुख,पोना रविंद्र पारधी,पोशि विवेक पारासुर,पोशि प्रसाद घरत आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून  सराईत गुन्हेगार नूर मोहम्मद कच्छी उर्फ पापा याला ताब्यात घेतला आहे . तर त्याचे सहकारी प्रसार झाले आहेत . घटना स्थळावरून इंजेक्शन ,बेशुद्ध करणारे औषधें , दोर , इनोव्हा गाडी ,सूरी आदी साहित्य हस्तगत केले आहे .