पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांच्या प्रयत्नातून रक्तदान शिबिर , शिबिराला मोठा प्रतिसाद

पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांच्या प्रयत्नातून रक्तदान शिबिर , शिबिराला मोठा प्रतिसाद




तळोजा / प्रतिनीधी-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून तळोजा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या प्रयत्नाने पोलिस स्टेशनमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

         केंद्र सरकारच्या आदेशानुसार १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घर घर तिंरंगा उपक्रम राबविण्यात आला. मात्र तळोजा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यानी आगळा वेगळा संकल्पना हाती घेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन पोलिस आयुक्त बिपिनाकुमार सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यात पाहिले रक्तदान पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यानी केले. या रक्तदान शिबिरात २५-३० गावातील रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी गर्दी केली होती. या रक्तदान शिबिरात १५० पर्यंत रक्तदान करण्यात येईल असा विश्वास जितेंद्र सोनवणे यांनी व्यक्त केला. यावेळी पोलिस सह आयुक्त डॉ. श्री जय जाधव, आमदार बाळाराम पाटील, पोलिस उप आयुक्त ( गुन्हे शाखा) सुरेश मेंगडे, पोलिस उपायुक्त शिवराज पाटील, पोलिस सह आयुक्त भागवत सोनवणे, मा. नगरसेवक विष्णू जोशी,मा. नगरसेवक , गणेश कडू, किरण दाभने आदीसह मोठ्या संख्येने विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री साई ब्लड सेंटर पनवेल च्या डॉक्टरने खूप मेहनत घेतली.