ह. भ. प. कृष्णा ठाकूर यांचे निधन

 ह. भ. प. कृष्णा ठाकूर यांचे निधन 



पनवेल(प्रतिनिधी) तालुक्यातील लाडिवली येथील ज्येष्ठ नागरिक तसेच वारकरी सांप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन सातत्याने अध्यात्मिक कार्य करणारे 
ह. भ. प.कृष्णा गणपत ठाकूर उर्फ किसनबुवा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 
  मृत्यू समयी ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले, तीन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे, असा परिवार आहे. 
        किसनबुवा यांच्या अंत्ययात्रेस सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित होते.  प्रेमळ आणि हसतमुख स्वभाव राहिलेले ह. भ. प. कृष्णा ठाकूर यांना आदराने 'किसनबुवा' या नावाने ओळखले जात होते.त्यांचा दशक्रिया विधी सोमवार दिनांक २९ ऑगस्टला श्री क्षेत्र गुळसुंदे येथे तर उत्तर कार्य लाडीवली दत्त मंदिर येथे राहत्या घरी मंगळवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी होणार आहे.