कवयित्री वैशाली जगताप-बोरसे यांना साहित्य भुषण पुरस्कार
सचिन पाटील (अलिबाग)अलिबाग: येथील विद्या विकास प्राथमिक शाळेतील शिक्षिका कवयित्री वैशाली जगताप-बोरसे यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष अॅड रविंद्र भैय्या पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार कवयित्री वैशाली जगताप-बोरसे यांना प्रदान करण्यात आला. त्यामुळे वैशाली जगताप-बोरसे यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.