कोंकण विभागीय माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ध्वजचिन्हांचे वाटप

कोंकण विभागीय माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ध्वजचिन्हांचे वाटप


नवी मुंबई दि. 12 :-  स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त राबविण्यात येणाऱ्या “घरोघरी तिरंगा” या उपक्रमांतर्गत कोंकण  विभागीय माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोंकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांच्याहस्ते ध्वजचिन्हांचे वाटप करण्यात आले.     

        केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दि. 9 ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या महोत्सवाचा एक भाग म्हणून कोकण विभागात “घरोघरी तिरंगा”  हा अत्यंत महत्त्वकांशी उपक्रम दि.13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान राबविण्यत येत आहे. “घरोघरी तिरंगा”  या उपक्रमातंर्गत  कोंकण विभागातील विविध कार्यालयांमार्फत समाज माध्यमे, जाहिराती, होर्डिंग्ज, बॅनर, रॅली,  अशा विविध माध्यामांतून नवनवीन उपक्रम राबवून “घरोघरी तिरंगा”   या उपक्रमाची जनसामान्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. कोंकण विभागातील शासकीय कार्यालयांमार्फत केलेल्या या सर्व कामांची व्यापक प्रसिद्धी कोंकण विभागीय माहिती कार्यालय व या कार्यालयाच्या अधिनस्त असलेले जिल्हा माहिती कार्यालय यांच्यामार्फत होत आहे. 

“घरोघरी तिरंगा”  या उपक्रमाचाच एक भाग म्हणून विभागीय माहिती कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोंकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी ध्वजचिन्हाचे वाटप करुन स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वज विकत घेऊन आपल्या घरोघरी राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी आवाहन केले.