पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठ्यात रक्तदान शिबीर संपन्न; प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह आणि आमदार प्रशांत ठाकूर यांची लाभली प्रमुख उपस्थिती
पनवेल(प्रतिनिधी) देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्यावतीने विविध सेवाकार्य असलेल्या 'सेवा पंधरवडा'चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे युवा मोर्चाच्यावतीने शनिवारी (दि. १७) कामोठे येथील भाजप व आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांची उपस्थिती लाभली.
यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश भाजपचे श्री. चौबे, कामोठे शहर मंडल अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, गोपीनाथ भगत, भाऊ भगत, रवींद्र गोवारी, प्रदीप भगत, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, कुसूम म्हात्रे, महिला मोर्चाच्या कामोठे अध्यक्षा वनिता पाटील, भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्या तामखडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, कामोठे युवा मोर्चाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, उत्तर भारतीय सेलचे जिल्हा संयोजक जितेंद्र तिवारी, रुपाली सिन्हा, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशाला जगात ताकदवान बनविण्याचे काम करणारे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध आहे. ते अंत्योदयाचा संकल्प देत देशातील गोर-गरीब, शोषित व वंचित वर्गाच्या कल्याणाकरिता देशसेवेचे ध्येय साध्य करत विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी समर्पित भावनेने कार्यरत असतात. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्यावतीने दिनांक १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर पर्यंत 'सेवात्मक', 'रचनात्मक', 'व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व' अशा विविध सेवाकार्य असलेल्या 'सेवा पंधरवडा'चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज कामोठे येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले. यावेळी कृपाशंकर सिंह यांनी सेवा पंधरवडा निमित्त पनवेल परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचे कौतुक केले. या शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिराला चांगला प्रतिसाद दिला.