कुष्ठरोग शोध मोहीम व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सक्रिय क्षयरोग शोध मोहीम

कुष्ठरोग शोध मोहीम व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सक्रिय क्षयरोग शोध मोहीम

नवीन पनवेल : पनवेल तालुक्यात 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यान कुष्ठरोग व क्षयरोग अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये घरोघर जाऊन 3 लाख 86 हजार 960 लोकांची तपासणी करण्यात येणार आहे..

            पनवेल तालुक्यात गेल्या दोन वर्षांमध्ये 216 कुष्ठरुग्ण उपचार घेवून बरे झाले आहे आहेत. या वर्षामध्ये 121 कुष्ठरुग्ण उपचार घेत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत 13 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहीम” व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सक्रिय क्षयरोग शोध मोहीम” राबविण्यात येणार आहे. तालुके व महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी एकूण लोकसंख्या 3 लाख 86 हजार 400 चे सर्वेक्षण होणार असून त्यासाठी एकूण 276 आरोग्य पथके व 55 पर्यवेक्षक नेमण्यात आली आहेत. एकूण 77 हजार 280 घरांमध्ये सर्वेक्षण होणार आहे. आदिवासी भागातील पाडेवस्त्याडोंगराळ भाग आदी भागात कुष्ठ व क्षयरोगाविषयी स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींच्या मदतीने प्रभावी जनजागृती करण्याचे नियोजन असल्याचे सहाय्यक संचालक डॉ.आर.एच.बाविस्कर आणि पनवेल तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील नखाते यांनी  कळविले आहे. या मोहिमेचे सुपरविजेन राजेंद्र वानखडे व अर्जुन ठाकूर करणार आहेत.  


--

मयूर तांबडे  (पत्रकार)

tambademayur3236@gmail.com
धन्यवाद  9323935050/9322935050