संजय गांधी योजना समितीच्या बैठकित ८२ प्रकरणे मंजूर

 संजय गांधी योजना समितीच्या बैठकित ८२ प्रकरणे मंजूर

नवीन पनवेल : संजय गांधी योजना समितीची बैठक विजय तळेकरतहसीलदार पनवेल यांचे अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय पनवेल येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी संजय गांधी योजना समितीच्या बैठकित ८२ प्रकरणे मंजूर करण्यात आली.

         सदर बैठकीमध्ये विनोद लचके-नायब तहसीलदार, (संजय गांधी योजना शाखा)संतोष पाटील(अ.का.)अर्चना घरत(अ.का.)गौतम कांबळेमहसूल सहाय्यकसुवर्णा कोळीतांत्रिक सहाय्यक व भरत काथारा यांच्या उपस्थितीत विशेष सहाय्य योजनेंतर्गत राज्य शासन पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजनाश्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनाकेंद्र शासन पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना तसेच राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजना इ. योजनांच्या लाभार्थ्यांच्या प्रकरणांना मंजुरी देण्यात आलेली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेची 71 प्रकरणे मंजूर करण्यात आली. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेची ४  प्रकरणे मंजूर करण्यात आली. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेची १ प्रकरणे मंजूर करण्यात आली. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेची २  प्रकरणे मंजूर करण्यात आली. राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेची ४ प्रकरणे मंजूर करण्यात आली.

          वरीलप्रमाणे संजय गांधी निराधार अनुदान योजनाश्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनाइंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनाइंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनांच्या प्रकरणात दर प्रति महिना रक्कम रु. १ हजार ते १ हजार २०० मिळून एकूण रक्कम रु. ८१ हजार ५०० इतके अनुदान तसेच कुटूंब अर्थसहाय्य लाभार्थ्यांना प्रत्येकी एक रकमी २० हजार प्रमाणे ८० हजार असे एकूण १ लाख ६१ हजार ५०० एवढे अनुदान वाटप करणेसाठी बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. तसेच पनवेल तालुक्यात दरमहा विशेष सहाय्य योजनेंतर्गत एकूण ५ हजार १३१ लाभार्थ्यांना रक्कम रूपये ४४ लाख १९ हजार ६०० एवढे अनुदान वाटप करण्यात येते.

 

 


--