शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांना मातृशोक

 शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांना मातृशोक


पनवेल दि.०२ (वार्ताहर) : शिवसेना रायगड-पनवेल जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या मातोश्री स्व.जमुनाबाई नारायण घरत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर बेलपाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

स्व.जमुनाबाई नारायण घरत यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले शिरीष नारायण घरत, रामकृष्ण नारायण घरत यांच्यासह मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.