उपमुख्यमंत्री देवेद्रजी फडणीस व आ.प्रविण दरेकर यांनी मा.आ. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नवीमुंबई येथिल निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त सदिच्छा भेट दीली

उपमुख्यमंत्री देवेद्रजी फडणीस व आ.प्रविण दरेकर यांनी मा.आ. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नवीमुंबई येथिल निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त सदिच्छा भेट दीली


नवी मुंबई (प्रतिनिधी)-   महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.ना.देवेद्रजी फडणीससाहेब व आमदार प्रविण दरेकरसाहेब यांनी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या सानपाडा, नवीमुंबई  येथिल निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त सदिच्छा भेट दिली. सोबत डाॅ.प्राची नरेंद्र पाटील,आदित्य व आयुष नरेंद्र पाटील छायाचित्रात दिसत आहेत.

        माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचेशी मा.ना.देवेद्रजी फडणीससाहेब यांची अत्यंत जवळीक व त्यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दरवर्षी ते गणेशोत्सवानिमित्त सदिच्छा भेट देतात. यावर्षी देखील गणेशोत्सवानिमित्त भेट दिल्याबद्दल माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी देवेंद्रजी फडणीससाहेब यांचे व आमदार प्रविण दरेकरसाहेब यांचे आभार व्यक्त केले.